サマース・ラムダス・スワミニは、人間がどのように振る舞うべきか、どう振る舞わないべきかについて
माणसाने आपले वर्तन कसे ठेवावे आणि कसे ठेवू नये याबद्दल समर्थ रामदास स्वामीनी नि:संदिग्ध, खूप सविस्तर आणि मोलाचे मार्गदर्शन त्यांच्या या काव्यात केले आहे. त्यांनी या लेखनाला ‘मनाचे श्लोक’ असे नाव दिले आहे आणि त्यात वारंवार मनाला संबोधित केले आहे खरे पण इथे मन हे केवळ एक रूपक असून लेखन सर्व मानवजातीला उद्देशून केलेले उपदेशात्मक लेखन आहे